मंगळवार, 17 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 17 डिसेंबर 2024 (11:43 IST)

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नागपूर सभेत दरोडेखोरांनी 26 लाखांचे दागिने चोरले, 11 आरोपींना अटक

arrest
मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच नागपुरात पोहोचले होते.मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी झाली होती. याचाच फायदा दरोडेखोरांनी घेतला असून आरोपींनी रोख रक्कम, मोबाईल फोन, सोनसाखळी अशा वस्तू चोरल्या आहे. एका पोलिस अधिकाऱ्यांची सोनसाखळी चोरली आहे. 
 
एका अधिकाऱ्याने सांगितले की, रविवारी शपथविधी समारंभाच्या आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागत रॅलीमध्ये 30 हून अधिक लोकांनी त्यांचे पाकीट आणि इतर सामान हरवल्याची तक्रार केली. 
ते म्हणाले की, 31 जणांच्या तक्रारीनंतर राणा प्रताप नगर, सोनेगाव आणि बजाज नगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

पोलिसांनी अहिल्यानगर मधून एका टोळीतील 11  जणांना अटक केली आहे. अरोपींनी रोख रक्कम, मोबाईल फोन, सोनसाखळी वस्तू चोरल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि आणखी आरोपींना पकडण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. 
Edited By - Priya Dixit