रोहित पवार यांनी मुलांसाठी खेळण्याच्या दुकानात केले शॉपिंग
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांचा खेळण्याच्या दुकानातील एक फोटो समोर आला आहे. निवडणुकीच्या धामधुमीत कुटुंबाला वेळ देता आला नाही. त्यामुळे स्वत:च्या मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलावं, यासाठी त्यांना खेळणी खरेदी केली.
आमदार रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक पेजवर आमदार विश्वजीत कदम यांच्यासोबत खेळण्याच्या दुकानातील फोटो शेअर केला आहे. रोहित पवार आपल्या फेसबुक पेजवर म्हणतात, “अधिवेशनाचे कामकाज संपवून याच घडामोडींवर चर्चा करत मी आणि आमदार डॉ.विश्वजित कदम गाडीने एकत्र निघालो होतो, साहजिकच गप्पा राजकीय रंगल्या होत्या पण अचानक रस्त्याच्या बाजूला एक खेळण्याचं दुकान दिसल्याबरोबर दोघांनाही त्या ठिकाणी जाण्याचा मोह आवरला नाही. आमदार म्हणून आम्ही आमचं कर्तव्य पार पाडत आहोत पण याकाळात आपल्या घराची विशेषतः आपल्या मुलांची आठवण देखील येत असते. आता घरी पोहचल्यानंतर मला भेटल्यानंतर आणि त्यांच्यासाठी घेतलेली खेळणी हातात बघून माझ्या मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद असेल तो माझ्यासाठी खूप समाधानकारक असेल”.