बहिणींच्या खात्यात आठवड्याभरात जमा होणार 3000 रुपये
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजने अंतर्गत लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतात. ही योजना कायमची सुरु राहणार असल्याचे राज्य सरकार विश्वास देत आहे. मात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याचे पैसे जमा झाले नसल्यामुळे बहिणी संभ्रमात आहे.
लाडकी बहीण योजनेचा डिसेम्बर 2024 महिन्याचा हफ्ता आणि जानेवारी 2025 मधील हफ्ता अखेरच्या आठवड्यात जमा करण्यात आला. बहिणींना अशा होती की फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता 28 फेब्रुवारीला जमा होईल.
मात्र अद्याप हफ्ता जमा झालेला नाही. काही तांत्रिक कारणांमुळे हफ्ता जमा करण्यात उशीर झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही योजना बंद होण्याचे विरोधक बोलत आहे. आता या योजने अंतर्गत लाडक्या बहिणींच्या खात्यात आठवड्याभरात पैसे जमा होण्याचे सांगितले जात आहे.
लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्यांचा एकत्रित हप्ता दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये असे एकूण 3000 रुपये दिले जाणार आहेत. ही रक्कम येत्या आठ दिवसांत पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे.
Edited By - Priya Dixit