शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 5 जून 2022 (11:51 IST)

औरंगाबाद मध्ये बसमध्ये बॉम्बची अफवा; प्रवाशांमध्ये खळबळ

औरंगाबाद येथे शिवनेरी आणि शिवशाही बस मध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरल्याने प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. दुपारी 2 वाजेच्या सुमारास पोलीस मुख्यालयातील कंट्रोल रूमचा फोन वाजला आणि अज्ञाताने मध्यवर्ती बस स्थानकातून निघालेल्या बस क्रमांक एम एच 06 एस 9587 या बस मध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचे सांगितले. बस तातडीने महावीर चौकात थांबविण्यात आली आणि बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने बसचा ताबा घेत सर्व प्रवाशांना खाली उतरवून बस कर्णपुरा मैदानात नेली. तपासल्यावर बस मध्ये बॉम्ब आढळले नाही. तर शोध घेत असता बॉम्ब सदृश्य वस्तू म्हणून पॉवर बँक असल्याचं निष्पन्न झाले.  

बस मध्ये बॉम्ब असल्याचे समजतातच बसच्या प्रवाशात खळबळ उडाली. औरंगाबाद येथे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शनिवारी शहरात होते. पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे बसची आणि प्रवाशांच्या सामानाची तपासणी करण्यात आली. बॉम्ब शोधक पथकाला बॉम्ब नसून पॉवर बँक असल्याचे आढळले त्यामुळे पोलिसांनी आणि प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला. येत्या 8 जून रोजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा औरंगाबाद येथे होणार असून त्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवले आहे.