शुक्रवार, 5 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 10 जानेवारी 2022 (08:35 IST)

शिर्डीच्या साई मंदिराबाबत पसरली अफवा; प्रशासनाने दिलं स्पष्टीकरण

Rumors spread about Sai Temple in Shirdi; The explanation
करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दैनंदिन रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाल्याने राज्य सरकारने पुन्हा निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मंदिरांबाबत अद्याप नवी नियमावली जाहीर करण्यात आलेली नाही.
असं असताना शिर्डीच्या साई मंदिराबाबत सोशल मीडियात अफवा पसरल्याने मंदिर प्रशासनाकडून खुलासा करण्यात आला आहे.शिर्डीतील साई मंदिर सध्या आहे त्याच पद्धतीने सुरू राहणार असून नवे नियम लागू केल्याच्या सोशल मीडियातील
अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन साईबाबा संस्थान मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.साईबाबांचे मंदिर शनिवार व रविवार रोजी बंद राहणार असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र मंदिराबाबतचे अद्यापपर्यंत कुठलेही आदेश शासन स्तरावरून निर्गमित झालेले नाहीत. त्यामुळे अशा अफवांवर भाविकांनी विश्वास ठेवू नये, असं मंदिर प्रशासनाने म्हटलं आहे.शासनाकडून यासंदर्भातील आदेश प्राप्त झाल्यास याबाबत साईबाबा संस्थान मंदिर प्रशासनाकडून भाविकांच्या माहितीस्तव तशी माहिती जारी केली जाईल, असं साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी सांगितलं आहे.दरम्यान, करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर
मंदिराबाबत पुन्हा निर्बंध लागू होण्याची शक्यता निर्माण झाल्याने मंदिर परिसरातील व्यावसियांमध्ये पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.