मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

महाराष्ट्र राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी रुपाली चाकणकर

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पदाचा राजीनामा दिला त्यामुळे हे पद रिक्त झाले होते. त्यानंतर आता या पदावर महाराष्ट्र राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी पुणे येथील रुपाली चाकणकर यांची निवड केली आहे. 
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुण्यात याबाबतची घोषणा करत त्यांची नियुक्ती केली आहे. राष्ट्रवादीच्या पुणे शहराच्या महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर म्हणून कार्यरत आहेत. 
 
विधानसभा निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला राज्यात मोठे धक्के बसले आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार प्रसाद लाड यांनी काँग्रेस सोडत, नंतर मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनीही राष्ट्रवादीला सोडले आहे. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ यांनीही नुकतंच प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर चित्रा वाघ यांच्यासह राष्ट्रवादीचे काही आमदार भाजप प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे येत्या ३० जुलै रोजी अनेक नेते आमदार भाजपात प्रवेश करणार आहेत.