मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 6 जुलै 2017 (16:41 IST)

साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्यासाठी अॅम्बेसेडरचा शोध

शिर्डी संस्थानने साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्यासाठी ब्रँड अॅम्बेसेड नेमण्याची तयारी सुरु केली आहे. यामध्ये क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर, अभिनयाचा बादशाह अमिताभ बच्चन आणि बाहुबली प्रभास यांची नावं आहेत. शिर्डी संस्थान अध्यक्ष सुरेश हावरे यांनी याबाबतची माहिती दिली.

अद्याप यापैकी कुणाशीही संपर्क नाही मात्र शिर्डी संस्थान या सर्वांना संपर्क करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असंही सुरेश हावरे यांनी सांगितलं. शिर्डीचं साई संस्थान हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील एक प्रमुख देवस्थान आहे. देशभरातील भाविक साईंच्या दर्शनासाठी शिर्डीत येत असतात. याच शिर्डी संस्थानाच्या साईबाबा समाधी शताब्दी सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठीच सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन आणि प्रभास यांपैकी एकाला ब्रँड अॅम्बेसेडर करण्याची तयारी, शिर्डी संस्थानने केलं आहे.