शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 31 मे 2022 (09:28 IST)

समीर वानखेडेंची चेन्नईत बदली

sameer vankhade
आर्यन खान क्रूझ ड्रग प्रकरणाचा चुकीचा तपास केल्याचा ठपका ठेवण्यात आलेल्या मुंबई एनसीबीचे माजी झोनल अधिकारी समीर वानखेडेंची बदली करण्यात आली आहे. समीर वानखेडे यांना आता चेन्नईच्या DG TS म्हणजे करदाते सेवांचे महासंचालक बनवण्यात आलं आहे. समीर वानखेडे हे सध्या डीजीएमआरए पदावर कार्यरत आहेत.
 
समीर वानखेडे यांच्यावर आर्यन खान प्रकरणी चुकीचा तपास केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच या चुकीच्या तपासाबद्दल त्यांच्यावर केंद्र सरकारकडून कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत. 
 
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी अनेक आरोप केले होते. यानंतर एनसीबी मुख्यालयाने या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापना केली. या तपासाची जबाबादारी एनसीबीचे उपसंचालक जनरल संजय सिंह यांना सोपवण्यात आली.
 
आर्यनसह सहा जणांविरुद्ध कोर्टात आरोपपत्र दाखल करता येईल, असं ठोस आणि पुरेसे पुरावे या प्रकरणात मिळालेले नाहीत. एसआयटीच्या अहवालाची गांभीर्याने दखल घेत केंद्र सरकारने केंद्रीय अर्थ मंत्रालयाला याप्रकरणी कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.