मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified मंगळवार, 9 नोव्हेंबर 2021 (21:57 IST)

क्रांती म्हणाल्या, आम्ही राजभवनावर रडायला गेलो नव्हतो

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक सातत्याने एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या कुटुंबियांवर आरोप करताना दिसत आहेत.या आरोपांच्या अनुषंगाने  मंगळवारी समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती वानखेडे, वडील ज्ञानदेव वानखेडे आणि बहीण यास्मिन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला गेले होते. 
 
यावेळी क्रांती वानखेडे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, ‘आम्ही राजभवनावर रडायला गेलो नव्हतो. आम्ही आमचं निवदेन राज्यपालांना दिलं. ही एक सत्याची लढाई आहे. या लढाईत आम्हाला ताकदीची गरज आहे. त्या ताकदीचे आश्वासन आम्हाला राज्यपालांनी दिले.’
 
पुढे क्रांती म्हणाल्या की, ‘ज्या लोकांना असं वाटतं असेल हे लोकं गरीब बिचारे असं इकडून तिकडे फिरतायत. तसं नाही आहे. आम्ही योद्धा आहोत, सत्याचे योद्धा आहोत. आम्ही असंच लढत राहणार. आम्हाला राज्यपालांकडून चांगले आश्वासन निश्चित मिळाले आहे. स्फूर्ती मिळाली आहे. आम्ही जास्तीत जास्त सत्यासाठी निश्चित लढणार आहोत आणि विजय आमचाच होईल.’
 
‘कुठलेही पुरावे न दाखवता कोणत्याही स्तराला जाऊन आमच्या कुटुंबियातील सदस्यांवरील इज्जत अब्रुवर हल्ला केला जातोय. या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्यासमोर ठेवल्या. काही नाही थोडं धैर्य ठेवा, तुम्ही लढा, सत्याचाच विजय होणार, असा सकारात्मक प्रतिसाद राज्यपालांकडून मिळाला आहे. पुढे काय होत ते पाहूयात,’ असं क्रांती म्हणाल्या.