गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 1 जुलै 2023 (21:40 IST)

समृद्धी महामार्ग अपघात : त्या अपघाताच्या आठवणी झाल्या ताज्या

buldhana bus accident
बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर प्रवासी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर नाशिकमध्ये 8 ऑक्टोबर रोजी झालेल्या भीषण अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. नाशिकमध्ये ज्या दिवशी ही घटना घडली त्यादिवशीही शनिवारच होता आणि बुलढाण्याचे घटनाही शनिवारीच झाल्याने शनिवार घातवार ठरल्याचे दिसून येते. 
 
नाशिकमधे छत्रपती संभाजीनगर रोडवर 8 ऑक्टोबर 2022 रोजी पहाटे पाच-साडेपाचच्या सुमारास बस आणि ट्रकचा अपघात झाला होता. त्यात 12 जणांचा मृत्यू झाला होता. यवतमाळहून मुंबईकडे जाणारी चिंतामणी ट्रॅव्हल्सची बस निघाली होती तर धुळ्याहून पुण्याच्या दिशेने ट्रक जात होता. या दोन्ही वाहनांचा नाशिक-औरंगाबाद रस्त्यावरील मिरची हॉटेल जवळच्या चौकात भीषण अपघात झाला होता. चिंतामणी ट्रॅव्हल्स ही बस मिरची चौफुलीवर आली असताना बस आणि ट्रकमध्ये धडक झाली. यात ट्रॅव्हल बसला आग लागून 13 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही आग एवढी भीषण होती की, काही वेळात झालेल्या स्फोटाने परिसरातील नागरिक खडबडून जागे झाले होते

प्रत्यक्ष दर्शींच्या म्हणण्यानुसार, काहींनी खिडकीतून उड्या मारल्या, तर काही आगीत होरपळले. अपघातानंतर बसने पेट घेतला आणि साखर झोपेत असणार्‍या 13 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता, तर अनेकजण जखमी झाले होते. हा थरार आजही नाशिककरांना जसाच्या तसा आठवतोय. या अपघाताच्या आठवणी आजही समोर आल्या तरी काळजाचा थरकाप उडतो.  समृद्धी महामार्गावरील बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा परिसरात नाशिकच्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. या निमित्ताने नाशिक बस अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. नाशिकमध्ये घडलेली बस दुर्घटना शनिवारी पहाटे सव्वा तीन वाजेच्या सुमारास घडला. बुलढाण्यात झालेला अपघात शनिवारी पहाटे दिड वाजेच्या सुमारास घडला.

Edited  By - Ratnadeep Ranshoor