1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. One dead, 3 seriously injured in Samriddhi highway accident

Samriddhi highway accident :समृद्धी महामार्ग भीषण अपघातात एकाचा मृत्यू 3 गंभीर जखमी

accident
पंत प्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे उदघाटन करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे.आज पुन्हा या महामार्गावर भीषण अपघात घडला असून अपघातात एकाचा मृत्यू तर तीन गंभीर रित्या जखमी झाले आहे.हा अपघात अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वे तालुक्यात चालकाचा कारवरील नियंत्रण सुटल्याने वाहन डिव्हाइडरला धडकल्याने झाला. या अपघातात एक जण जागीच ठार होऊन तिघे गंभीर जखमी झाले आहे. अपघातात वाहनाच्या पुढील भाग चक्काचूर झाला आहे.अपघातात झालेल्या जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु  आहे.  

Edited by - Priya Dixit 
 
पुढील लेख
Hockey WC: उपांत्यपूर्व फेरीसाठी आठ संघ क्रॉसओव्हरमध्ये खेळतील, भारताचा सामना न्यूझीलंडशी