शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 22 जानेवारी 2023 (11:01 IST)

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार अॅड मोरेश्वर टेमुर्डे यांचे निधन

Shradhanjali RIP
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार अॅड मोरेश्वर टेमुर्डे यांचे वयाच्या 82 व्या वर्षी झोपेतच हृदयविकाराच्या झटका आल्याने त्यांच्या वरोराच्या राहत्या घरी निधन झाले. त्यांचे पार्थिव  अंत्यदर्शनासाठी त्यांच्या राहत्या घरी thewnyat आले असून त्यांचे मृतदेह त्यांचा इच्छेनुसार देहदान केले जातील. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले 1 मुलगी असा परिवार आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय होते. मोरेश्वर हे दोनदा 1991 ते 1995 आणि 1995 ते 2000 पर्यंत वरोरा क्षेत्राचे प्रतिनिधी होते. तसेच 1991 ते 1995 पर्यंत विधानसभांचे उपाध्यक्ष देखील होते. जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाच्या उभारणीसाठी त्यांचा मौल्याचा वाटा होता. त्यांच्या निधनाने वरोरा विधानसभा क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात असून शोककळा पसरली आहे. 
 
Edited by - Priya Dixit