रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 22 जानेवारी 2023 (10:01 IST)

'बेळगाव देऊन टाका आणि प्रश्न मिटवा,' असं शरद पवारांनी कोणाला म्हटलं?

sharad pawar
पिंपरी- चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते खासगी रुग्णालयाचे उदघाटन झाले. रुग्णालयाचे चेअरमन हे बेळगावातील आहेत.आपले आणि शरद पवार यांचे चांगले मैत्रीचे संबंध असल्याने शरद पवार हे नेहमी बेळगाव मागत असतात, घ्यायचे असेल तर पूर्ण कर्नाटक घ्या बेळगाव नको, असे डॉ. प्रभाकर कोरे आपल्या भाषणात म्हणाले.
 
हाच धागा पकडून शरद पवार यांनी 'मी तुमच्या अनेक संस्थांची उदघाटनं केली आहेत. मी काही मागत नाही. तेवढं बेळगाव देऊन टाका आणि प्रश्न संपवा' अशी मिश्किल टिपण्णी केली.लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.
 
रुग्णालयाचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे आणि शरद पवार यांचे मैत्रीचे संबंध आहेत. त्यांच्या संस्था, वास्तू, रुग्णालयाचे उदघाटन शरद पवार यांचे हस्ते झाले आहे.
 
यावर बोलत असताना डॉ. प्रभाकर कोरे म्हणाले की, "शरद पवार मला नेहमी म्हणतात बेळगाव कधी देणार? साहेब, आम्ही मुंबई प्रांतातील आहोत. माझ्या सर्व संस्था या मुंबईत आहेत. म्हणून मी साहेबांना म्हणत असतो घ्यायचे असेल तर पूर्ण कर्नाटक घ्या, फक्त बेळगाव नको."

Published By- Priya Dixit