मंगळवार, 28 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified शनिवार, 21 जानेवारी 2023 (15:44 IST)

दिव्य शक्ती बघण्याची तुम्हीच रायपूरला या बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण महाराज यांचे असे प्रति आव्हान

बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण महाराज यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे चमत्कार दाखवण्याचे ३० लाख रुपयांचे आव्हान स्वीकारले, पण आपण नागपुरात येणार नाही, दिव्य शक्ती बघण्याची तुम्हीच रायपूरला या असे प्रतिआव्हान दिले आहे. आपल्या दिव्यशक्तीने चमत्कार घडवून आणण्याचा दावा धीरेंद्र कृष्ण महाराजांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय संघटक प्रा. श्याम मानव यांनी आव्हान दिले आहे.
त्यांनी आपल्या दिव्यदृष्टीचा चमत्कार सिद्ध करून दाखवावा आणि ३० लाख रुपये घेऊन जावे, असे आव्हानच श्याम मानव यांनी दिले आहे. हे आव्हान दिल्यानंतर महाराज इरेला पेटले आहेत. त्यांनीही श्याम मानव यांचे आव्हान स्वीकारले आहे. मी चमत्कार सिद्ध करण्यास तयार आहे. पण मी नागपूरला येणार नाही. तुम्हीच रायपूरला या, असे आव्हानच महाराज यांनी दिले आहे. तर, श्याम मानव यांनी नागपूरमध्ये पत्रकार भवनात त्यांनी चमत्कार सिद्ध करावा. ऐनवेळी आम्ही त्यांच्यासमोर दहा लोक ठेवू. या दहा लोकांचे नाव, वय, फोन नंबर आणि आईवडिलांची नावे त्यांनी सांगावीत, असे म्हटले आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor