शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 21 जानेवारी 2023 (22:31 IST)

कर्नाटकात जाऊन देवेंद्र फडणवीसांची थेट कन्नडमधून भाषणाला सुरुवात

devendra fadnavis
चिक्कमंगलुरू येथे सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी भाषणाची सुरूवात थेट कन्नड भाषेतून केली. त्यानंतर उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवत फडणवीसांचं अभिनंदन केलं.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
”आज पर्यंत मी अनेक शहरांमध्ये गेलो. मात्र, चिक्कमंगलुरू इतकं स्वच्छ शहर मला कुठेही दिसलं नाही. जेव्हा मी या शहरात दाखल झालो, तेव्हा येथील स्वच्छता बघून भारावून गेलो. याचे पूर्ण श्रेय सीटी रवी यांचं नेतृत्व आणि महानगर पालिकेच्या कर्मचार्यांना जातं, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Edited by : Ratnadeep Ranshoor