शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 22 जानेवारी 2023 (13:33 IST)

हिवाळ्यात राज्यात पावसाच्या सरी कोसळणार

rain
सध्या सर्वत्र थंडीचा जोर वाढत आहे. देशातील विविध भागात थन्डीचा जोर दिसत आहे राज्यात देखील अनेक जिल्ह्यात तापमानात घट झाला आहे. सध्या कडाक्याच्या थंडीने महाराष्ट्र गारठला असून राज्यात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली आहे.त्यामुळे शेतातील पिकांवर परिणाम होऊ शकतो. 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान राज्यात पावसाच्या सरी कोसळणार आहे. सध्या मध्य  महाराष्ट्र  पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात धुक्याची चादर पसरली आहे. मुंबईत आणि उपनगरात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. येत्या काही दिवसात मुंबईच्या तापमानात घट होण्याची शक्यता आहे.