रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 15 ऑक्टोबर 2023 (10:37 IST)

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात ;12 जणांचा मृत्यू तर 23 जण जखमी

accident
समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा  वैजापूर येथील अगरसायगाव परिसरात रात्री 12.30 वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. नाशिकच्या इंद्रानगर येथे राहणारे 35 जण खासगी टेम्पो करून बुलढाणाच्या बाबा सैलानीच्या दर्शनाला गेले असता देवदर्शनावरून परतताना खासगी टेम्पो ट्रॅव्हलर ने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या ट्रकला मागून धडक दिली या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला त्यात एका चिमुकलीचा समावेश आहे. तर 23 जण जखमी झाले. या टेम्पो ट्रॅव्हलर मध्ये एकूण 35 जण होते. 
 
पोलिसांनी आणि स्थानिकांनी बचावकार्य सुरु केले असून जखमींना छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा रुग्णालयात  उपचारासाठी दाखल केले आहे. समृद्धी टोल नाक्यावर पोलिस एक ट्रक थांबवण्यासाठी, बाजूला घेत होते. त्याच वेळेस मागून आलेल्या या टेम्पो ट्रॅव्हलरने ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की बसच्या समोरील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.
 




Edited by - Priya Dixit