बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 14 ऑक्टोबर 2023 (21:34 IST)

Gadchiroli : प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या

murder
कोरची तालुक्यात दवंडी गावात एका पत्नीने अनैतिक संबंधामुळे आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याची घटना घडली आहे.  
 
कोरची तालुक्यात दवंडी गावात एका किराणा दुकानदाराची निर्घृण हत्या केल्याची घटना 11 ऑक्टोबरला रात्री घडली असून त्याचा उलगडा बेडगाव पोलिसांनी केला. लखन सुंहेर  सोनार असे मयताचे नाव आहे. मयत लखनचे किराणामालाचे दुकान होते.  

11 ऑक्टोबरच्या रात्री अज्ञात 5 ते 6 मारेकऱ्यांनी घरात शिरून धारधार शस्त्रांनी पतीची हत्या केल्याची फिर्याद मयत लखनच्या पत्नी सरिताने बेडगाव पोलीस ठाण्यात केली. त्या फिर्यादी वरून अज्ञाताच्या विरोधात हत्येच्या गुन्हा दाखल करण्यात आला.  
 
मात्र या खुनाचा उलगडा बेडगाव पोलिसांनी केला असून अनैतिक संबंधातून ही हत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात फिर्यादी पत्नी सरिता आणि तिचा प्रियकर बळीराम गावडे आणि त्याचा सहकारी सुभाष नंदेश्वर या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.  

11 ऑक्टोबरच्या रात्री सरिता आणि लखन हे झोपलेले होते. त्यांना दोन अपत्ये असून त्यांचा मुलगा प्रणय आणि मुलगी पायल हे एका वेगळ्या खोलीत झोपले होते.

सरिता आणि बळीराम गावडे यांच्यात विवाहबाह्य संबंध होते. मात्र त्यांच्यात सरिताच्या पती लखन हा अडथळा होता. त्याला वाटेतून काढण्यासाठी त्यांनी त्याची हत्या करण्याचा कट रचला. आणि ठरल्याप्रमाणे 11  ऑक्टोबरच्या रात्री त्याचा सुभाष नंदेश्वर बळीराम गावडेंच्या मदतीने हत्या करण्याचे ठरवले. 

घटनेच्या रात्री सरिता लखन झोपले असताना पत्नीने  घराचे दार लोटून घेतले. आणि दारूच्या नशेत आरोपी बळीराम आणि सुभाषने घरात शिरून झोपेतच धारधार शस्त्राने लखनच्या गळयावर वार केले त्यात त्याचा मृत्यू झाला नंतर त्याच्या बायको ने आरडाओरड केली.

पोलिसांनी बायकोची चौकशी केली तिने चौकशीतून खुनेची कबुली दिली आहे. प्रियकर बळीराम आणि त्याचा सहकारी सुभाषच्या मदतीने हा खून केला आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली असून कोरची न्यायालयात 14 ऑक्टोबर रोजी हजर करण्यात आले. 
 
Edited by - Priya Dixit