गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 11 जुलै 2023 (07:19 IST)

पत्नीने मुलांच्या मदतीने पतीची हत्या

murder
Wife killed husband with help of children धक्कादायक घटना नाशिकमधून समोर आली आहे. पतीचे नात्यातील एका महीलेशी अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून पत्नी व मुलाने पतीच्या डोक्यात मुसळीने वार करून खून केल्याचे उघडकीस आले आहे. इंदिरानगर परिसरातील दामोदर चौक यशवंत नगरमध्ये घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
 
काय आहे संपूर्ण प्रकरण?
याबाबत अधिक माहिती अशी की, आज नाशिकमध्ये अशीच एक नात्याला हादरवून टाकणारी घटना घडली असून पत्नीने मुलांच्या मदतीने पतीची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. दादाजी गवळी असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
 
दादाजी गवळी (४१) (रा. समृद्धी प्लाझा, यशवंत नगर दामोदर चौक पाथर्डी) यांचे नात्यातील एका महिलेशी अनैतिक संबंध होते. त्या कारणावरून पत्नी व त्यांच्यात नेहमी भांडण होत असतं. मध्यंतरी दोघांमध्ये वाद मिटवण्यात आले होते. हाच राग मनात ठेवून त्यांची पत्नी सुनीता गवळी (४०) व त्यांचा मुलगा निशांत गवळी (२०) यांनी गाढ झोपेत असलेले मयत दादाजी गवळी त्यांच्या डोक्यात मुसळीने जोरदार प्रहार करत त्यांचा निर्दयपणे खून केला.
 
आरोपी पोलिसांच्या ताब्यात...
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपयुक्त चंद्रकांत खांडवी, स पो आ अंबादास भुसारे इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पगारे, महिला पोलीस उपनिरीक्षक मनीषा शिंदे यांच्यासह गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी त्वरित घटनास्थळी पोहोचले. तसेच घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला.