सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 22 सप्टेंबर 2022 (16:36 IST)

संदीप देशपांडे म्हणाले, कमजोर मुलावर आईवडिलांचे जास्त प्रेम असते

sandeep deshpande
उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईतील गोरेगाव येथील शिवसेना गटप्रमुखांचा मेळावा घेतला. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी एकनाथ शिंदेंवर मिंधे तसेच मुन्नाभाई या शब्दात टीका केली होती. त्यावर शिंदे गटासह आता मनसेनेही प्रत्युत्तर दिले आहे.
 
त्यांचे कर्तृत्व शून्य
संदीप देशपांडे म्हणाले, कमजोर मुलावर आईवडिलांचे जास्त प्रेम असते. तेवढे कर्तृत्वान मुलावर नसते. कारण त्यांना माहित असते हा स्वतःचे सर्वकाही व्यवस्थित करु शकतो. मात्र कमजोर मुलगा काहीही करु शकत नाही. त्यामुळे आईवडिल त्याला घर देतात. सर्व काही देतात. कारण त्याचे कर्तृत्व शून्य असते. असेच बाळासाहेबांच्या पुण्याईवर जगणारे हे बांडगुळं आहेत. त्यांचे स्वतःचे कर्तृत्व शून्य आहे. म्हणूनच इतरांना मिंधे, मुन्नाभाई म्हणत आहेत. या शब्दांमध्ये देशपांडेंनी ठाकरेंना टोला लगावला आहे.
 
खुर्चीवरुन मनसेचा टोला
मुंबईतील गोरेगाव येथील शिवसेना गटप्रमुखांचा मेळाव्यात उद्धव ठाकरे म्हणाले, व्यासपीठावर मी एक रिकामी खुर्ची पाहिली. ती संजय राऊत यांची आहे. मी आत्ताच खुलासा करतो. संजय राऊत हे मोडेन पण वाकणार नाही, या निश्चयाने लढत आहेत. लढाईत ते सोबत आहेत. सर्वात आघाडीवर ते आहेत. ठाकरेंच्या या वक्तव्याची मनसेने ट्विट करत खिल्ली उडवली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी, उद्या तुमची पण खुर्ची रिकामी ठेवावी लागेल तयारी ठेवा, असे ट्विट करत शिवसेनेला डिवचले आहे.