गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 21 सप्टेंबर 2022 (15:49 IST)

मुख्यमंत्री शिंदेंची नक्कल महागात, डुप्लिकेटवर गुन्हा

duplicate shinde
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारख्या हुबेहूब दिसणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
विजय माने असे त्या व्यक्तीचे नाव असून हे मुख्यमंत्री शिंदे यांच्यासारख्या वेशभूषेमुळे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया वर देखील चर्चेचा विषय ठरले होते. मात्र माने यांनी सराईत गुंड शरद मोहोळ याचसोबत फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केले होते. या प्रकाराची पोलिसांकडून गंभीर दखल घेतली असून याप्रकरणी माने विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
मुख्यमंत्री शिंदे यांच्यासारख्या दिसणाऱ्या विजय माने यांच्यावर पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनेनंतर आता विजय माने यांनी याबाबत विजय माने यांनी स्पष्टीकरण देत म्हटले आहे की फोटो व्हायरल करणारा व्यक्ती दुसरा कुणीतरी आहे तसेच मुख्यमंत्री माझ्यासाठी देव आहेत. त्यांची प्रतिमा कधी मलिन होईल असे कार्य मी कधी केले नाही आणि करणारही नाही.