1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 21 सप्टेंबर 2022 (15:27 IST)

पत्रा चाळ प्रकरणातील आरोपावर शरद पवार यांची प्रतिक्रिया

Sharad Pawar's reaction to the allegation in the Patra Chal case
आरोपानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत भाजपाने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ईडीचे आरोपपत्र व २००६ साली मी घेतलेल्या बैठकीचे आरोप खोटे आहेत. तरीही चौकशी करावी. चौकशीतून आरोप खोटे निघाले तर, आरोप करणाऱ्यावर काय कारवाई करणार, हे राज्य सरकारने जाहीर करावे, असे आव्हान शरद पवार यांनी केले.
 
शरद पवार काय म्हणाले?
पत्रा चाळप्रकरणी न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोपपत्रात माझे नाव असल्याचे म्हटले जात आहे. चौकशी करणाऱ्या संस्थेने कोर्टात काय सांगितलं? तसेच तेव्हा राज्य सरकारमध्ये काय चर्चा झाली, याबाबतची कागदपत्रे उपलब्ध आहेत. त्यांचा अभ्यास केला तर सर्व गोष्टी स्पष्ट होतील. चौकशीला नाही म्हणण्याची आमची भूमिका नाही. चौकशी झाल्यानंतर हा आरोप वास्तव आणि सत्याला धरून नसेल, तर काय भूमिका घेणार, हे राज्य सरकारने जाहीर करावे, असे शरद पवार म्हणाले.