Jalgaon : तमाशात नाचताना पोलिसाचा VIDEO व्हायरल
Photo -social Media : तमाशात नाचणं एका पोलिसाच्या चांगलंच अंगाशी आलं आहे. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी एका सहायक फौजदाराला निलंबित केले आहे. भटू वीरभान नेरकर असं निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे.
याच प्रकरणात जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या आणखी एका कर्मचाऱ्याची चौकशी सुरु आहे. तमाशात पोलीस कर्मचाऱ्याचा नाचतानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात हा कर्मचारी केवळ नाचत नाहीये तर पैसे ओवाळून टाकत असल्याचं दिसूून येत आहे.
हा प्रकार जळगावातील असून यामुळं पोलीस दलाची नाचक्की होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान जळगावचे पोलीस अधीक्षक यांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.