शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 21 सप्टेंबर 2022 (08:48 IST)

शहाजीबापू पाटलांनी अजित पवारांवर टीका केली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विविध कारणांमुळे ‘मातोश्री’वर थांबायचे पण अजित पवार पहाटेच मंत्रालयात यायचे

shahaji bapu patil
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार हे समजल्यावर आम्ही सगळ्या ५६ आमदारांनी आनंदाने ही बाब मान्य केली
शहाजीबापू पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व निधी, योजना आणि कामं पळवली म्हणत, शहाजीबापू पाटलांनी अजित पवारांवर टीका केली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विविध कारणांमुळे ‘मातोश्री’वर थांबायचे पण अजित पवार पहाटेच मंत्रालयात यायचे, अशी टीका शहाजीबापू पाटलांनी केली आहे. ते जळगावात एका जाहीर सभेत बोलत होते.
 
महाविकास आघाडी सरकारमधील खदखद बोलून दाखवताना शहाजीबापू पाटील म्हणाले की, २०१९ च्या विधानसभा निवडणुका होईपर्यंत सर्व काही ठीक होतं. महाराष्ट्रात भाजपा आणि शिवसेना युतीचं सरकार स्थापन होणार होतं. पण अचानक आम्हाला एका हॉटेलमध्ये बोलवण्यात आलं. तिथे एक आठवडाभर आम्हाला ठेवलं. तेथून दुसऱ्या हॉटेलमध्ये नेलं तिथेही आठवडाभर ठेवलं. मग तिसऱ्या हॉटेलमध्ये नेलं, शाळेतली पोरंसुद्धा एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जात नाहीत, तसे त्यांनी आमदारांना पळवलं.
त्यामुळे आम्हालाच वाटायला लागलं की, आम्ही आमदार आहोत की कोण आहोत? कुणी पण उचलतंय आणि कुठेपण घेऊन जातंय. या सर्व घडामोडीनंतर महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचं महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार हे समजल्यावर आम्ही सगळ्या ५६ आमदारांनी आनंदाने ही बाब मान्य केली, असंही ते म्हणाले.