शिवाजीपार्कसाठी दोन्ही गट आक्रमक, मुंबई महापालिकेची सावध भूमिका
कोणता निर्णय घ्यावा या पेचात अडकलेली आहे.अशातच शिंदे गटाला बीकेसीतील ग्राऊंड दसरा मेळाव्यासाठी मिळालेले आहे. मात्र, दोन्ही गट शिवाजीपार्कसाठी आक्रमक असून मुंबई महापालिकेने सावध भूमिका घेतल्याचे समजते आहे.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची उद्या गोरेगावमध्ये जाहीर सभा आहे. दसरा मेळाव्याआधीच ही सभा होत असल्याने ते या वादावर काय बोलतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शिंदे गटाला दसरा मेळाव्यासाठी मैदान मिळाले असले तरी ठाकरे गटाला कोणतेही मैदान देण्यात आलेले नाही. यामुळे मोठ वाद उद्भवण्याची शक्यता आहे.
शिंदे किंवा ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर परवानगी देऊ नये, असा मुंबई महापालिकेचा अभिप्राय असल्याचे समजते आहे. न्यायालयात खरी शिवसेना कोणाची असा प्रश्न प्रलंबित आहे. यामुळे मुंबई महापालिकेने एका गटाला शिवाजी पार्क दिला तर नाराजी ओढवून घेतली जाऊ शकते. याबाबत विधी आणि न्याय विभाग दोन दिवसांत अहवाल देणार आहे. एकाला परवानगी दिली तर कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता. यामुळे आपण निर्णय न घेतलेला बरा, अशी भूमिका या अभिप्रायामध्ये घेण्यात आल्याचे समजते आहे.