बुधवार, 12 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 21 सप्टेंबर 2022 (11:23 IST)

अवघ्या 500 रुपयांमध्ये 2 अल्पवयीन मुलींना विकले

Sold to girls for Rs.500
कुटुंबाच्या आर्थिक स्थितीचा फायदा घेत दोन अल्पवयीन मुलींची पाचशे रुपयांमध्ये विक्री केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना जव्हार येथील धारणपट्टीमध्ये घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अहमदनगर जिल्ह्यातील एका मेंढपाळाकडे एक मुलगी 3 वर्षांपासून तर दुसरी एक वर्षापासून बालमजुरी करत होत्या. या दोघी मेंढपाळाकडे विविध काम करत होत्या. या बदल्यात त्यांना वर्षाकाठी 12 हजार रुपये आणि एक मेंढी देण्याचं कुटुंबाला आश्वासन देण्यात आलं होतं मात्र प्रत्यक्षात वर्षाला अवघे पाचशे रुपये दिले जात असल्याची माहिती समोर आली आहे.
 
हे प्रकरण कळल्यावर श्रमजीवी संघटनेने पुढाकार घेतला. मुलींना खरेदी केलेल्या मेंढपाळा विरोधात जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आठ वर्षीय मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलंय तर सहा वर्षीय मुलीचा शोध सुरू आहे.