1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 20 सप्टेंबर 2022 (09:13 IST)

निवडणूक आयोगासमोर शिंदे करणार आमदारांची ओळख परेड

eknath shinde
शिवसेना कोणाची हा निर्णय आता निर्णायक टप्प्यावर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांची निवडणूक आयोगासमोर ओळख परेड करणार आहे. एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत असलेल्या सर्व आमदारांना घेऊन दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगापुढे येणार आहेत. शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचं याबाबत निवडणूक आयोगात ठाकरे-शिंदे गटात वाद सुरू आहे.
 
निवडणूक आयोगासमोर जाऊन एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत असलेले आमदार दाखवणार आहेत. हे आमदार दाखवून एकनाथ शिंदे शिवसेना आणि धनुष्यबाण या चिन्हावर आपला हक्क असल्याचं सांगणार आहेत. 
याआधी एकनाथ शिंदेंनी त्यांच्यासोबत असलेल्या आमदार-खासदार आणि पदाधिकाऱ्यांचं शपथपत्र निवडणूक आयोगाला दिलं आहे.
 
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला मिळणार? यावरून सध्या निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे.
 
एकनाथ शिंदे यांनी जून महिन्यात शिवसेनेच्या 40 आमदारांना घेऊन बंड केलं. एकनाथ शिंदे यांच्या या बंडामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं, यानंतर राज्यातलं महाविकासआघाडी सरकार कोसळलं.
 
सरकार पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केलं आणि मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.