मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 20 सप्टेंबर 2022 (09:05 IST)

भाजपच सरकार पाडेल तेव्हा एकनाथ शिंदेंना आपली चूक लक्षात येईल-जयंत पाटील

jayant patil
"हे सरकार कार्यकाळ तर पूर्ण करणार नाहीच, आता फक्त एवढाच प्रश्न आहे की सरकार बरखास्त कधी करायचं. भारतीय जनता पार्टीच्या कॅल्क्युलेशननुसार जेव्हा गणितं जुळायला लागतील, तेव्हा भाजपाच हे सरकार बरखास्त करेल. त्यादिवशी एकनाथ शिंदेंना आपण किती मोठी चूक केली आहे, हे लक्षात येईल", असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातच संघर्ष सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर पाटील बोलत होते.
 
"हे सरकार लवकरच कोसळेल. कारण लोकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. भाजपासोबत गेलेले बरेच आमदारही नाराज आहेत. त्यामुळे कधीही काहीही होऊ शकते, म्हणून राज्याच्या प्रशासनादेखील यांचं ऐकायचं थांबवलं आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांही माहीत आहे की हे फार दिवसाचे आपले साथी नाहीत. कधीही जाऊ शकतात. त्यामुळे नवीन सरकारची राज्याच्या प्रशासनावरची पकडही सैल झाली आहे", असंही पाटील म्हणाले.