शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 20 सप्टेंबर 2022 (08:09 IST)

शिवसेनेच्या संपर्क कार्यालय मागच्या बाजुला सट्टा मटका खेळला जात होता

uddhav shinde
मुंबईत दसरा मेळाव्यावरून चढाओढ सुरू असताना, तिकडे शिंदे गटाने जळगावात ठाकरेंच्या शिवसेनेची पोलखोल केली आहे. पुढच्या बाजुला शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाची ढाल करत मागच्या बाजुला सट्टा मटका खेळला जात होता.
 
जळगावात शिंदे गटातल्या महिला पदाधिकारी शोभा चौधरींनी भरवस्तीत सुरू असलेला हा सट्टा मटका अड्डा उघडकीस आणला आहे. जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीमध्ये सोमवारी साडेअकरा वाजता चौधरींनी या कार्यालयात धडक दिली. महत्वाचे म्हणजे शोभा चौधरी या तेव्हा शिवसेनेतच होत्या. परंतू आता त्या गुलाबराव पाटलांसोबत शिंदे गटात गेल्या आहेत.
 
चौधरी यांच्याच भागात हे शिवसेनेचे संपर्क कार्यालय आहे. त्यात आतमध्ये खुलेआम सट्टा मटका सुरु होता. यामध्ये टाईम बाजार, मिलन डे -नाईट, कल्यान मटका आदींचे काळे प्लॅस्टिकचे टांगते बोर्ड लावण्यात आले होते. हा मटक्याचा अड्डा ठाकरेंच्या शिवसेनेशी संबंधीत लोक चालवत असल्याचा आरोप चौधरी यांनी केला आहे. तसेच हे लोक परिसरातून ये-जा करणाऱ्या महिला, तरुणींची सतत छेडछाड करत असल्याचाही त्यांनी आरोप केला आहे.