रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 18 मे 2023 (22:17 IST)

संघाचे कार्यकर्ते प्रदीप कुरुळकरांनी देशाची माहिती पाकिस्तानला दिली

nana patole
नाना पटोले यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) गंभीर आरोप केले आहेत. “हनीट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला माहिती पुरवल्याप्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने अटक केलेले डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुळकर आरएसएसचे कार्यकर्ते होते. असं असूनही संघ त्यावर बोलायला तयार नाही,” असा आरोप नाना पटोलेंनी केला. तसेच कुरुळकर त्यांच्या चार पिढ्या संघात असल्याचं सांगत आहे, असंही पटोलेंनी नमूद केलं. ते गुरुवारी (१८ मे) नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
 
नाना पटोले म्हणाले, “संघाचे कार्यकर्ते प्रदीप कुरुळकरांनी देशाची माहिती पाकिस्तानला दिली. म्हणजे संघात देशाच्या बरबादीचा प्लॅन केला जात असेल, असा आपण अर्थ लावू शकतो. संघ अद्याप त्यावर बोलायला तयार नाही. संघ म्हणतो आमचा संबंध नाही आणि कुरुळकर म्हणतो की, माझ्या चार पिढ्या संघात आहेत. आता त्यांच्या तत्वांचा प्रश्न आहे.
 
Edited by : Ratnadeep Ranshoor