बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 29 मे 2024 (13:58 IST)

सांगली : मध्यरात्री कालव्यामध्ये पडली ऑल्टो कार, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

accident
महाराष्ट्रातील सांगलीमध्ये एक भीषण कार अपघात झाला आहे. तासगांव-मनेराजुरी मार्गावर चिंचनी परिसरात मध्यरात्री एक ऑल्टो कार कालव्यामध्ये पडल्यामुळे यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. 
हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे. 
 
हा कार अपघात मध्यरात्री 12.30 च्या जवळपास झाला. हे सर्व मृतक तासगांव मधील सिव्हिल इंजिनियर राजेंद्र जगन्नाथ पाटील यांच्या कुटुंबातील आहे. या दुर्घटनेमध्ये राजेंद्र जगन्नाथ पाटील वय 60 वर्षे, पत्नी सुजाता पाटील वय 55 वर्षे, मुलगी प्रियंका वय 30 वर्षे, नातू ध्रुव वय 3 वर्षे, राजवी वय 2 वर्षे, कार्तिकी वय 1 वर्षे, जखमी मुलगी स्वप्नाली वय 30 वर्षे असे आहे. 
 
या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचली व  जखमी तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात एवढा भीषण झाला की एकच कुटुंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे. 

Edited By- Dhanashri Naik