बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 मे 2022 (09:06 IST)

सांगली जिल्हा महापूराचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज

सांगली जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार महापूरासारख्या मोठ्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी प्रशासनाच्या तयारीची रंगीत तालीम औदुंबर येथे घेण्यात येत आहे. यानिमित्ताने प्रशासनाकडे उपलब्ध असलेली आपत्कालीन साधनसामग्रीच्या उपयुक्ततेची चाचणी घेण्यात येत आहे. तसेच आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न आहे. महापूराचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. असे मत प्रांताधिकारी गणेश मरकड यांनी औदुंबर येथे बोटींग प्रशिक्षण कार्यक्रमात बोलत होते.
 
नेहमीच येतो पावसाळा तसेच नेहमीच येतो महापूर अशीच काहीशी स्थिती गेल्या काही वर्षांत झालेली दिसते. या आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे. पलूस तालुक्यातील कृष्णाकाठ औदुंबर अंकलखोप येथे महापूर पुर्व आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत बोट प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.
 
यावेळी बोट चालक नितीन गुरव, महेश कदम, रॉयल कृष्णा बोट क्लबच्या सदस्यांनी सर्वांना प्रशिक्षण दिले.
यावेळी प्रांताधिकारी गणेश मरकड, तहसीलदार निवास ढाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संगिता माने, मंडल टि एस अधिकारी पवार, तलाठी बाबुराव जाधव, गौसमोहंमद लांडगे यांच्या सह सर्व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.