शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 25 मार्च 2023 (11:49 IST)

सांगलीची प्रतीक्षा बागडी ठरली पहिली 'महिला महाराष्ट्र केसरी'

महाराष्ट्राच्या कुस्तीच्या इतिहासात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि जिल्हा तालीम संघाच्या वतीने सांगलीच्या जिल्हा क्रीडा संकुलात यंदा प्रथमच महिला केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कुस्तीची ही स्पर्धा सांगली येथे पार पडली असून स्पर्धेच्या अंतिम लढतीत प्रतीक्षा बागडी हिने वैष्णवी पाटीलला चितपट करून पहिली महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला आहे. प्रतिक्षाला मानाची चांदीची गदा देण्यात आली. 
 
पहिली महिला महाराष्ट्र केसरीचा मान कोण घेणार कोणाला मानाची चांदीची गदा मिळणार या कडे सर्वांचे लक्ष वेधले होते. स्पर्धेची अंतिम लढत सांगलीची महिला पैलवान प्रतीक्षा बागडी आणि कल्याणची पैलवान वैष्णवी पाटील हिच्या मध्ये पडली. प्रतीक्षा बागडी आणि वैष्णवी पाटील या हरियाणाच्या इसारमध्ये जवळपास 5-6 ते महिने रूमपार्टनर होत्या. दोघींना एकमेकींच्या डावपेचांबद्दल अंदाज होता. तथापि बाजी मारण्यात प्रतीक्षा यशस्वी झाली. प्रतिक्षाने वैष्णवीला चितपट करून स्पर्धा जिंकून पहिली महिला महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला. या स्पर्धेसाठी राज्यातील जवळपास 400 हून अधिक महिला कुस्तीगीर दाखल झाल्या होत्या. या अंतिम सामन्यात बागडे आणि पाटील मध्यंतरापर्यंत चार गुणांनी बरोबरीत होत्या. मात्र मध्यंतरानंतर बागडींने पाटीलला चितपट करीत 4 विरुद्ध 10 गुणांनी महिला केसरी महाराष्ट्र केसरी ठरली आणि चांदीची गदा पटकावली.प्रतीक्षा बागडीच्या या विजयानंतर सर्व स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
 
Edited By- Priya Dixit