रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 4 मार्च 2021 (17:51 IST)

संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर सही झाली

विरोधी पक्षाने संजय राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला पण तो अद्याप राज्यपालांना पाठवला नसल्याचा आरोप केला होता. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर सही केली असून अखेर संजय राठोड यांचा राजीनामा पाठवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
 
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात संजय राठोड यांचं नाव आल्यानंतर राठोड यांनी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सोपवला. मात्र या राजीनाम्यावर अद्याप सही केली नसल्याचा आरोप भाजपने केला होता. फ्रेम करण्यासाठी राजीनामा घेण्यात आला आहे, अशी टीका भाजपने केली होती. राठोड यांच्या राजीनाम्यावरून विरोधक सरकारला घेरणार होतं. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनाम्यावर सही केली असून आजच राज्यपालांकडे राजीनामा पाठवणार असल्याची माहिती मिळतेय.