सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 30 जून 2022 (08:05 IST)

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याला संजय राऊत जबाबदार- दीपक केसरकर

Deepak Vasant Kesarkar
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याला शिवसेनेचे नेते संजय राऊत जबाबदार आहेत असं मत आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून बोलताना केसरकर यांनी आपल्या भावना मांडल्या. संजय राऊत यांच्याबद्दल आमदारांच्या मनात असलेली नाराजी केसरकर यांनी काल माध्यमांमध्ये उघडपणे व्यक्त केली.
 
दीपक केसरकर म्हणाले, "हा राजीनामा आमच्यासाठी आनंदाची गोष्ट नाही. ही आमच्यासाठी दुःखाची गोष्ट आहे. जो संघर्ष आम्हाला करावा लागला याला पूर्णपणे जबाबदार काँग्रेस, राष्ट्रवादी आहे आणि त्यापेक्षा जास्त जबाबदार हे संजय राऊत आहेत. रोज उठायचं आणि काहीतरी टीका करायची. असं करून त्यांनी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारमध्ये एक दुरावा निर्माण केला. त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या विकासावर झाला.