सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 7 एप्रिल 2022 (21:23 IST)

संजय राऊत यांचं लक्ष पक्षप्रमुख पदावर की मुख्यमंत्री पदावर? : नारायण राणे

narayan rane
भाजपा खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संजय राऊतांवर बोचरी टीका केली. यात संजय राऊतांवर कारवाई झाल्यानंतर त्यांनी शक्तीप्रदर्शन करणं ही अयोग्य असल्याची भावना नारायण राणे यांनी व्यक्त केली. तसेच, संजय राऊत यांचं लक्ष पक्षप्रमुख पदावर की मुख्यमंत्री पदावर आहे, असा खोचक सवालही त्यांनी आपल्या ट्वीटच्या माध्यमातून केला. 
 
"कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र?? काळा पैसा मिळवायचा, अन् कारवाई झाली की बोंबलायचं... त्यानंतर केलेली पापं झाकण्यासाठी शक्ती प्रदर्शन करायचं. यातून जनतेने काय बोध घ्यावा? संजय राऊत यांचं लक्ष पक्षप्रमुख पदावर की मुख्यमंत्री पदावर?", असं बोचरी टीका करणारं ट्वीट नारायण राणे यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून केलं.