1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 6 एप्रिल 2022 (21:40 IST)

नखं कापून शहीद होण्याचा प्रयत्न काही लोकं करतात’ संजय राऊतांना फडणवीस यांचा जोरदार टोला

sanjay devendra
शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कारवाई केली आहे. ही कारवाई राजकीय सूडापोटी करीत असल्याचा आरोप राऊत यांच्यासह शिवसेना नेत्यांनी केला आहे. या टीकेचा खरपूस समाचार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. भारतीय जनता पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हमाले की, काही जण नखं कापून शहीद होण्याचा प्रयत्न करीत आहेत. लोकांचे लक्ष वेधण्यासाठी काही लोकं बोलतात. मराठी माणसाच्या नावावर राज्य करायचे आणि मराठी माणसांनाच लुटायचे हे अजिबात चालणार नाही, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे.