1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 6 एप्रिल 2022 (21:08 IST)

नाशिक शहरात आजपासून हे कलम लागू; या सर्व गोष्टींवर निर्बंध

mumbai police
राज्यात कोरोनाचे निर्बंध हटले तरी आता नाशिक शहरात आजपासून नवे निर्बंध लागू झाले आहेत. यासंदर्भात पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी आज आदेश काढले आहेत. त्यानुसार, आजपासून नाशिक शहरात महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१चे कलम ३७ (३) लागू झाले आहे. हे प्रतिबंधांत्मक आदेश आहेत. हे आदेश येत्या २० एप्रिलपर्यंत लागू होणार आहेत. सध्या सुरू असलेला रमजान महिना, येत्या काळात होऊ घातलेली रामनवमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती,  हनुमान जयंती, गुड फ्रायडे या उत्सवांमुळे हे आदेश काढण्यात आले आहेत. त्यानुसार, पोलिसांच्या परवानगीशिवाय मिरवणूक काढणे, अधिक व्यक्तींना जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस आयुक्तांनी दिला आहे.