मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 9 ऑगस्ट 2022 (08:02 IST)

“संजय राऊतांचा तुरुंगातील मुक्काम वाढणार”

sanjay raut
संजय राऊत सध्या कोठडीत असताना भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर आणखी गंभीर आरोप केले आहेत. वसई विरारमधील २००० कोटी रुपयांचा जमीन बांधकाम घोटाळा, पर्ल ग्रुप घोटाळा, दुबई येथे पंचतारांकित हॉटेल्समध्ये बिल्डर्ससोबत झालेल्या बैठका यांची चौकशी सुरू व्हायची बाकी आहे. त्यामुळे राऊत यांचा तुरुंगातील मुक्काम वाढणार, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.
 
“संजय राऊत यांची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये नवाब मलिक यांच्या शेजारी होत आहे. आता पत्राचाळ घोटाळ्याची चौकशी सुरू झाली आहे. यानंतर वसई विरारमधील २ हजार कोटींचा जमीन बांधकाम घोटाळा, पर्ल ग्रुप घोटाळा, दुबई येथील पंचतारांकित हॉटेल्समध्ये बिल्डर्ससोबत झालेल्या बैठका तसेच चीन यात्रा याची चौकशी होणार आहे. त्यामुळे या घोटाळ्यांची चौकशी होईपर्यंत राऊतांचा मुक्काम लांबणार असे वाटत आहे,” असे किरीट सोमय्या म्हणाले आहेत.