बुधवार, 31 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

साडीचा महासेल, अवघ्या 10 रुपयांत साडी विक्रीला

saree in 10 rupees only in ulhasnagar
उल्हासनगरमध्ये रंग क्रिएशन दुकानात 5 जूनपासून हा महासेल सुरु करण्यात आला. याच वेगळेपण असं की  या सेलमध्ये खरेदी केलेली कोणतीही साडी अवघ्या 10 रुपयांना मिळत होती. या सेलची माहिती मिळताच मुंबई, ठाणे, उल्हासनगर याठिकाणच्या महिलांनी साडी खरेदी करण्यास एकच गर्दी केली.
 
महिला ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी लावलेल्या या सेलला सुरुवात झाल्यापासून येथे अनेक महिलांनी गर्दी केली. विशेष म्हणजे या ठिकाणी महिलांची गर्दीमुळे चेंगराचेंगरीसदृश चित्र निर्माण झालं होतं. त्यामुळे काही काळ या ठिकाणी पोलीसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. दरम्यान तीन दिवसांनंतर 8 जून अखेर दुकान मालकांनी हा सेल बंद केला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये या कारणाने दुकान मालकांनी दुकान बंद करण्याच निर्णय घेतला आहे.