शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 21 ऑक्टोबर 2023 (21:23 IST)

सतेज पाटील आणि खासदार धनंजय महाडिक एकाच व्यासपीठावर; राजकिय चर्चेला उधाण

satej patil
Satej Patil and MP Dhananjay Mahadik on the same platform कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये केंद्र स्थानी असलेले आणि जिल्ह्यासह राज्यपातळीवर ज्यांच्या राजकिय संघर्षाची चर्चा केली जाते असे आमदार सतेज पाटील आणि खासदार धनंजय महाडिक हे आज एकाच व्यासपीठावर पहायला मिळाले. आपल्या कार्यकर्त्यांमध्ये बंटी आणि मुन्ना अशा नावाने परिचित असलेल्या जिल्ह्यातील दोन मातब्बर विरोधकांनी एकाच व्यासपीठ हजेरी लावल्याने अनेकांनी आपल्या भुवया उंचावल्या आहेत तसेच या घटनेमुळे जिल्ह्यातील राजकारणात चर्चेचा विषय बनला आहे.
 
जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कसबा बावड्यात कृषी विभागाच्यावतीने प्रशिक्षण विभागाचे उद्घाटन करण्यात आले. या शासकिय कार्यक्रमाला आमदार सतेज पाटील आणि राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचेही नाव निमंत्रण पत्रिकेवर होते. त्यामुळे दोघाही नेत्यांनी पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमाला जातीने उपस्थिती लावली. आमदार हसन मुश्रीफ हे कार्यक्रमास्थळी पोहचण्या आधी वेगवेगळ्या ठिकाणी थांबणेच पसंत केले. इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ आमदार सतेज पाटील यांनी पालकमंत्र्यांचे स्वागत केले, तर इमारतीच्या आत खासदार धनंजय महाडिक यांनी स्वागत केले.