गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 17 ऑक्टोबर 2023 (17:07 IST)

प्लॅटफॉर्मवर दोघांमध्ये तुफान हाणामारी

platform

Bihar Train Fighting: 

सोशल मीडियावर हाणामारीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. व्हिडीओमध्ये ट्रेनमधील अपर बर्थवर एक तरुण आधीच बसलेला आहे. त्याच्या शेजारी दुसरा एक तरुण येतो. त्याला देखील याच सीटवर बसायचं असतं. त्यामुळे या दोघांमध्ये एकाच सीटवरून वाद होतो.
 
पुढे या वादाचे रुपांतर हाणामारीत होते. दोघांची हाणामारी त्यांच्यासोबत असलेल्या आणखीन एक व्यक्तीने आपल्या फोनमध्ये कैद केलीये. सीटवरून भांडताना दोन्ही तरुणांना हा व्यक्ती शांत बसण्यास सांगत आहे. मात्र दोघेही एकमेकांवर तुटून पडतात. लाथा बुक्क्यांनी एकमेकांना मारहाण करतात.
 
दोघांची भांडणे सुरू असताना ट्रेनमधील प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती.  @gharkekalesh या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय.  एका यूजरने लिहिलं की,एकदम जबरदस्त फाइट. तर आणखीन एकाने अशा पद्धतीने ट्रेनमध्ये हाणामारी करणे रिस्की असल्याचं म्हटलंय.