Bihar Train Accident :नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसचे 5 डबे रघुनाथपूरजवळ रुळावरून घसरले
बिहारच्या बक्सरमधून मोठी बातमी समोर येत आहे ज्यामध्ये बक्सरच्या रघुनाथपूर स्टेशनजवळ नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसला अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बक्सरच्या रघुनाथपूर स्टेशनजवळ नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसचे 5 डबे रुळावरून घसरले आहेत.नॉर्थ ईस्ट एक्सप्रेस ही ईशान्येकडे जाण्यासाठी महत्वाची ट्रेन मानली जाते.
रघुनाथपूर स्थानकाजवळ नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसचे 5 डबे रुळावरून घसरल्याच्या घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. अधिक माहितीची प्रतीक्षा आहे. ट्रेन क्रमांक 12506 नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेस आनंद विहार, दिल्लीहून कामाख्याला जात होती. मात्र, या ट्रेनला बिहारमधील बक्सरमध्ये अपघात झाला.
नवी दिल्लीहून कामाख्याला जाणाऱ्या नॉर्थ एक्स्प्रेसला बुधवारी रात्री बिहारमध्ये अपघात झाला. बक्सर जंक्शनवरून ट्रेन सुटल्यानंतर काही वेळातच रघुनाथपूर पूर्व गुमतीजवळ हा अपघात झाला. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार रेल्वेच्या दोन बोगी रुळावरून घसरल्या आहेत. ट्रेनचा वेग जास्त नव्हता. पूर्व मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जखमींबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही.
Edited by - Priya Dixit