Marathi Biodata Maker

राज्यातील मुलींचा जन्मदर 899 इतका कमी झाला

शनिवार, 15 एप्रिल 2017 (12:21 IST)

राज्यातील मुलीच्या जन्मदरात घट झाल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे. आरोग्य विभागानं जारी केलेल्या नागरी नोंदणी अहवालानुसार 2015 साली महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर 1000 मुलांमागे 907 मुलींचं होतं. मात्र 2016 या वर्षात या गुणोत्तरात जवळपास 8 टक्क्यांची घट झाली आहे. 2016 मध्ये राज्यातील मुलींचा जन्मदर 899 इतका कमी झाला आहे.

राज्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये मुलींच्या जन्मदरात घट पाहायला मिळत आहे. यात वाशिम जिल्हा आघाडीवर असून वाशिममध्ये लिंग गुणोत्तरात 62 टक्क्यांची घट झाल्याचं अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. वाशिमपाठोपाठ पुण्यासह उस्मानाबादमध्ये लिंग गुणोत्तरात घसरण झाली आहे. या जिल्ह्यांमध्ये 53 टक्क्यांनी मुलींचा जन्मदर घटल्याचं समोर आलं आहे.  राज्यातील एकंदर लिंग गुणोत्तर घटलं असलं तरीही भंडारा जिल्ह्यात मुलींचा जन्मदर जवळपास 78 टक्क्यांनी वाढला आहे. भंडारा पाठोपाठ परभणी आणि लातूरमध्ये मुलींच्या जन्मदरात वाढ झाली आहे.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

सरकारने ३६,००० कोटी रुपयांचे कर्ज माफ करून आपले वचन पूर्ण केले- चंद्रशेखर बावनकुळे

LIVE: महाराष्ट्र देशातील पहिले रेल्वे गेट-मुक्त राज्य बनेल

18,000 कोटी रुपयांचा बदलापूर मेट्रो-14 प्रकल्प आता दोन टप्प्यांत पूर्ण होणार

ऑनलाइन कोर्स घेताना 90% विद्यार्थी करतात ही चूक; तुम्ही करणे टाळा

महाराष्ट्र देशातील पहिले रेल्वे गेट-मुक्त राज्य बनेल, मुख्यमंत्री फडणवीस यांनी ६५ प्रकल्पांना मंजुरी दिली

पुढील लेख