गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 23 नोव्हेंबर 2020 (16:40 IST)

वो सूबह फिर ना आयेगी म्हणत राऊत यांचा भाजपला मिश्किल टोला

ती पहाट नव्हती, तो अंधकारच होता. त्या अंधकारामध्ये सत्तेची प्रकाशकिरणे परत कधीच दिसणार नाहीत असे संजय राऊत म्हणाले. चार वर्षानं पुन्हा आम्हीच जिंकणार आहोत. पहाटे पहाटे मला जाग आली, ते अजून झोपलेले नाहीत. आम्हाला धक्का काही बसला नव्हता. त्या स्मृती आनंददायक आहेत असे राऊत म्हणाले. त्या पहाटेनंतर त्यांना धक्के बसलेत, ते अजून सावरलेले नाहीत. वो सूबह फिर ना आयेगी असा मिश्किल टोला त्यांनी भाजपला 'त्या' शपथविधीच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने लगावला. 
 
राज्यपाल आणि सरकारमध्ये‌ संघर्ष नाही. ते घटनाबाह्य काम करून देशात बदनाम होतील असं मला वाटत नाही. ते अत्यंत संत सज्जनासारखे राज्यपाल आहेत. इतका संत आणि सज्जन राज्यपाल मी महाराष्ट्रात पाहिलेला नाही. अत्यंत सरसोट राजकारण करणारे ते नेते आहेत अशा शेलक्या शब्दात त्यांनी राज्यपालांवर टीका केली.