बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 सप्टेंबर 2021 (16:53 IST)

भितीदायक; चिमुकलीच्या गळ्याभोवती 2 तास विषारी कोब्राने विळखा घातला

मुंबई. महाराष्ट्राच्या वर्धा जिल्ह्यात हृदय पिळवटून टाकणाऱ्या अपघातात एका सापाने 6 वर्षांच्या मुलीच्या गळ्यात ती झोपेत असताना दोन तास विळखा घातला होता.जवळजवळ दोन तास ही छोटी मुलगी हालचाल न करता त्या नागाच्या संघर्षात हिमतीने दात देत स्तब्ध राहिली.ज्याने हे दृश्य पाहिले त्याचा अक्षरश: थरकापच उडाला. या घटनेचे चित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले.
 
यामध्ये 6 वर्षांच्या चिमुकलीच्या गळ्यात सापाने विळखा घातलेला दिसत आहे. काही लोक असा दावा करतात की हा विषारी साप कोब्रा असू शकतो. मुलीच्या गळ्यात सापाने विळखा घातल्याची बातमी कळताच एकाएकी खळबळ उडाली.
 
मुलीच्या कुटुंबीयांनी साप पकडणाऱ्याला बोलावले. कुटुंबियांच्या सांगण्यानुसार घाबरलेली मुलगी शांतपणे निजून होती. या चिमुकलीचे नाव पूर्वा गडकरी आहे.साप काढताना, चिमुकलीच्या हालचाली वर सापाने तिच्या हाताला दंश केले.तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.सध्या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू असून ती धोक्याबाहेर आहे.