गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :मुंबई , मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (21:08 IST)

सोमवारपासून शाळा सुरु?

varsha gaikwad
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी  सांगितले की राज्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे शालेय शिक्षण विभागानं प्रस्ताव ठेवला आहे. यामध्ये येत्या सोमवारपासून शाळा सुरु करण्यात याव्यात अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. पण स्थानिक प्रशासनानं याबाबत निर्णय घेण्यात यावा असंही या प्रस्तावात म्हटलं आहे, अशी माहिती  दिली.  
 
गायकवाड म्हणाल्या, "पालक, शिक्षणतज्ज्ञ आणि समाजमाध्याद्वारे अनेकांकडून शाळा सुरु करण्याची मोठ्या प्रमाणावर मागणी आमच्याकडे येत होती. त्यामुळं या काळात आम्ही अनेक स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यानंतर असा निर्णय घेण्यात आला की, ज्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी असेल अशा स्थानिक पातळीवरील सीईओ, कलेक्टर किंवा आयुक्तांना शाळा सुरु करण्याचे अधिकार देण्यात यावेत आणि त्यांच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात यावा. त्यानुसार याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात आला आहे.