1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Schoolgirl dies in accident in Lonikand area

लोणीकंद भागात अपघातात शाळकरी मुलीचा मृत्यू

अहिल्यानगर पुणे मार्गावर लोणीकंद भागात अपघातात दुचाकीवरून मैत्रिणीसह शिकवणीतून घरी जाणाऱ्या शाळकरी मुलीचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुलीचे वय १४ वर्षाचे असून  अनन्यादादाभाऊ गावडे असे तिचे नाव आहे. या प्रकरणी मोटारचालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, १० जून रोजी मयत अनन्याआणि तिची मैत्रीण शिकवणीला गेल्या होत्या. दुपारी शिकवणीतून घरी परत जाताना अहिल्यानगर रस्त्यावरील माउली बालश्रमाजवळ भरधाव येणाऱ्या मोटारीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात अनन्या गंभीर जखमी झाली. अपघातांनंतर मोटार चालक पसार झाला. अनन्याला गंभीर अवस्थेत तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचाराधीन असता तिचा दुर्देवी मृत्यू झाला. 
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज वरून आरोपी मोटारचालकाचे शोध घेत आहे. याबाबत तिचे वडील अनिल दादाभाऊ गावडे  यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे. 
About Writer
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
पुढील लेख
LIVE: कर्जमाफीच्या अटी हटवण्याच्या मागणीसाठी खासदार निलेश लांके यांनी २३ जून रोजी आंदोलनाचा इशारा दिला