राज्यातील २२ जिल्ह्यांतील शाळा आजपासून सुरु
कोरोनाच्या छायेत राज्यातील २२ जिल्ह्यांतील शाळांमध्ये आजपासून पहिल्यांदाच नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग भरत आहेत. मात्र पाचशेवर शिक्षकांना कोरोनाची झालेली बाधा व दुसऱ्या लाटेची भीती यापार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी पालकांनी संमतीपत्र भरून दिलेली नाहीत.
पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह मराठवाड्यातील पाच तर विदर्भातील ८ जिल्ह्यात शाळांची घंटा वाजणार आहे. मुंबई, ठाणे ३१ डिसेंबर तर पुणे व नागपूर महापालिका क्षेत्रातील शाळा १३ डिसेंबरपर्यंत सुरू होणार नाहीत. तर नाशिकसह जळगाव, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत टप्प्याटप्प्याने शाळा सुरू होणार आहेत. वर्ग सुरू असलेल्ल्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी रांगोळ्या घालण्यात येत आहेत.
या जिल्ह्यांत शाळा सुरू होत आहेत
पुणे (पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्र वगळून), कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, औरंगाबाद (ग्रामीण), बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद, नागपूर (ग्रामीण), यवतमाळ, गोंदिया, भंडारा, अकोला, गडचिरोली, वर्धा, अमरावती, अहमदनगर, रायगड, रत्नागिरी, नंदुरबार.