बुधवार, 1 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 28 ऑगस्ट 2021 (08:23 IST)

बघा दहावी बारावी पुरवणी परीक्षा वेळापत्रकाची माहिती

See Tenth Twelfth Supplementary Exam Schedule Information Maharashtra News Regional News In Marathi Webdunia Marathi
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी बारावी पुरवणी परीक्षा वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.त्यानुसार दहावी बारावी पुरवणी परीक्षा २२ सप्टेंबपासून,तर बारावीची परीक्षा १६ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.या दोन्ही परीक्षा लेखी स्वरुपात होणार आहेत.सविस्तर वेळापत्रक राज्य मंडळाच्या https://mahahsscboard.in/ या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द करुन,अंतर्गत मूल्यांकनाद्वारे निकोल जाहीर करण्यात आला.
 
या वेळापत्रकानुसार दहावीची परीक्षा २२ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत होईल.त्याचप्रमाणे बारावीची परीक्षा १६ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर या कालवधीत होणार आहे.व्यवसाय अभ्यासक्रम घेउन बारावीची परीक्षा १६ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत होईल.तत्पूर्वी, दहावीची प्रात्यक्षिक,तोंडी परीक्षा २१ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत होईल.बारावीची प्रात्यक्षिक,तोंडी परीक्षा १५ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे.